कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तिसरा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । कौटुंबिक वादातून पोलीस अंमलदार अनिल चुडामण तायडे (४५, नित्यानंद नगर) यांच्याविरुद्ध पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलीसांत तिसरा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निवासस्थानात वास्तव्याला असलेल्या उषा रतन बोदडे व अनिल तायडे दोघं पती-पत्नी असून, पोलीस दलात नोकरीला आहेत. कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. त्यामुळे दोघेही विभक्त राहत आहेत. ९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता अनिल तायडे पोलीस वसाहतीतील उषा बोदडे यांच्या घरी गेले. खोलीला बाहेरून कडी लावून घेत उषा यांना शिवीगाळ करत त्यांच्या दुचाकीला लोखंडी साखळी बांधून निघून गेले. या प्रकरणी बोदडे यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -