fbpx

शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी २४ रोजी ठिय्या आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णाची सेवा करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कामगार कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी शुक्रवार दि. २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून न्याय मागण्यासाठी राज्यभर आंदोलन छेडण्याचा निर्णय महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या बैठकीत कोरोना योद्धयांनी घेतला. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

कोविड १९ महामारीच्या काळात मंत्री, आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधी जिवाच्या भीतीने घरी बसले असताना स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता कोरोना रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कामगारांची सेवा अचानक कमी करण्यात आल्याने राज्यभरातील कोरोना योद्धयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत जीव धोक्यात घालून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी निकराने कार्य करणाऱ्या कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत कायम करणार यावे, या मागणीसाठी अजिंठा शासकीय विश्रामगृहात रविवार दिनांक १९ रोजी कोरोना योद्धयांची बैठक पार पडली. बैठकीत शुक्रवार दिनांक २४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, ३० सप्टेंबर रोजी कोरोना योद्धयांचा जिल्हास्तरीय मेळावा, कोरोना योद्धयांच्या न्याय मागण्यासाठी राज्यभरात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.

mi advt

साहित्यिक, सामाजिक संघटनांचा पाठिंबा
बैठकीत मार्गदर्शन करतांना मुकुंद सपकाळे यांनी, कोविड १९‌ ची भयानक परिस्थिती आपण आजही अनुभवत आहोत. जगभरात मानवी जीवन या महामारी मुळे संकटात असतांना कोरोना योद्धयांनी केलेल्या समर्पित कार्यामुळे महाराष्ट्रात कोरोना आटोक्यात आला आहे. यामुळे त्यांना शासकीय सेवेत सामावून घेणे हा कोरोना योद्धयांचा न्याय हक्क आहे, असे सांगितले तर संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी मागून न्याय मिळत नसतो त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागणार असून हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहिल, असे सांगितले. यावेळी डॉ.मिलिंद बागुल, डॉ.प्रा.सत्याजित साळवे, भरत शिरसाठ, प्रकाश तामस्वरे, प्रा.डॉ. प्रदीप सुरवाडकर आदी साहित्यिकांनी कोरोना योद्धयांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा दिला. बैठकीत हरिश्चंद्र सोनवणे, निलेश बोरा, युवराज सुरवाडे, भाग्यश्री चौधरी, अमोल कोल्हे त्यांनीही आपले मत व्यक्त केले. यावेळी मराठा सेवा संघाचे राम पवार, एच.एच. चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे खुशाल चव्हाण यांनी कोरोना योद्धयांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचे जाहीर केले.

यांची होती उपस्थिती
बैठकीस महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा, संविधान जागर समिती, प्रहार जनशक्ती पक्ष, छावा मराठा युवा महासंघ, संभाजी ब्रिगेड आदी संघटनाच्या कार्यकर्त्यांसह चंदन बिऱ्हाडे, रमेश सोनवणे, भारत सोनवणे, जगदीश सपकाळे, हरीश कुमावत, अक्षय जगताप, दिपाली भालेराव, मंदाकिनी विंचूरकर, ऐश्वर्या सपकाळे, सोना सुरवाडे, प्रतीक्षा सोनवणे, बेबी पटाडके, निलप्रभा देशमुख, शिला सपकाळे, ललिता पवार, चंद्रशेखर पाटील, गणेश महाले, सागर चौधरी, धनलाल चव्हाण, प्रशांत नेवे, सुधाकर सपकाळे, सुनिल परदेशी, चंदू सांळुके, रवींद्र चव्हाण, विनोद सपकाळे, कुणाल विसपुते, वाल्मीक सपकाळे, प्रशांत कोळी, दिलीप सपकाळे, पवन शिरसाळे यांच्यासह जिल्ह्यातील कोरोना योद्धा उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज