उपेक्षितांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आगळा वेगळा उपक्रम

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । वरखेडी ( ता.एरंडोल ) येथे रेड स्वस्तिक सोसायटीचे युवा सामाजिक कार्यकर्ते तथा रेड स्वस्तिक सोसायटीचे राष्ट्रीयसह  महाव्यवस्थापक रोशन मराठे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून रेड स्वस्तिक सोसायटी व छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या वतीने ग्रामीण भागात उपेक्षितांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचा आगळा वेगळा उपक्रम साजरा करण्यात आला.

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून दुय्यम व विभक्त रेशन कार्ड तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, विधवा, परितक्त्या, अंध-अपंग, वृद्धांसाठी, विविध शासकीय योजनेतून पगार (पेन्शन) मानधन योजनांचा लाभ, कोरोना काळात मृत पावलेल्या कुटुंबांसाठी शासकीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ अशा अनेक योजनांपासून वंचित असलेल्यांचा सर्वे छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करून त्या वंचितांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी रेड स्वस्तिक सोसायटीचे राष्ट्रीय सह महाव्यवस्थापक व छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संपर्कप्रमुख रोशन मराठे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्यक्ष स्वरूपात या वंचितांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

यासाठी एरंडोलच्या कार्यक्षम तहसीलदार सुचीताताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरखेडी येथील 120 लोकांना विविध योजनेचे कार्ड वाटप करून हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, या सर्व शासकीय योजनांपासून वंचित लाभार्थ्यांचा आनंद अवर्णनीय होता. यावेळी गावातील कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, आशा वर्कर, आरोग्य सेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, यांचा “कोरोना योद्धा” म्हणून योग्य सन्मान करण्यात आला.

दरम्यान, तहसीलदार यांनी मला आपल्या गावातील काहीही अडचणी असल्यास मला प्रत्यक्ष भेटावे सर्वांना तातडीने न्याय मिळेल असे जाहीर आश्वासन दिले. आणि महिलांना व सर्व उपेक्षितांना शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक तसेच रेड स्वस्तिक सोसायटीचे राष्ट्रीयसह महाव्यवस्थापक अशोक शिंदे यांनी योजनांच्या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी रोशन मराठे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माझ्या जन्मभूमीची सेवा करणे हे माझे परम कर्तव्य आहे. आपल्यासाठी जी सेवा माझ्या माध्यमातून शक्य असेल ती सेवा मी प्रामाणिकपणे पार पाडेन. यामध्ये आरोग्य, बेरोजगारी, आदिवासी बांधव, शेतकरी या सर्वांना सेवा देण्यासाठी मी तत्पर झालो आहे. भविष्यात माझे गाव महाराष्ट्रातले आदर्श गाव करण्याचा माझा प्रयत्न आहे. आपण मला सहकार्य व आशीर्वाद द्यावे असे आवाहन त्यांनी केले. अशोक शिंदे यांनी आपल्या मनोगतात या गावाने रेड स्वस्तिक सोसायटी व छत्रपती शिवाजी ब्रिगेडला रोशन सारखा कर्तुत्ववान व्यक्ती दिला आहे. आपले आभार मानण्यासाठी मी येथे आलो आहे असे सांगितले.आपणाला रेड स्वस्तिक व छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ज्या ज्या सेवा अपेक्षित आहेत त्या पूर्ण करण्याची ग्वाही मी आपणाला देतो. सुदैवाने प्रशासनाची साथ आपल्याला सर्वांना मिळाली आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

या आनंददायी कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून, रेड स्वस्तिक सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ. धनंजय बेंद्रे, नंदू रायगडे, लाईव्ह ट्रेण्ड न्यूज चे संपादक शेखर पाटील, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, उद्योजक भगवान मराठे, आनंदराव मराठे, रामचंद्र मराठे, व कार्यक्रमाचे आयोजक लोकनियुक्त सरपंच सिताराम सखाराम पाटील, छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, शरद पाटील, ज्येष्ठ समाजसेवक भावलाल काका पाटील, प्रवीण भाऊ गोसावी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -