fbpx

विहिरीत कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे गावाजवळील शेतातील विहिरीत काल दुपारी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने त्याची ओळख पटली नाही. त्यामुळे मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

याबाबत असे समजते की खेडगाव येथील विशाल मुसळे यांच्या गावानजीक असलेल्या शेतातील विहिरीत काल दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना दिल्यानंतर उपनिरीक्षक योगेश बोडके व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटली नाही.

mi advt

तीन चार दिवसापासून या व्यक्तीचा मृतदेह विहिरीत पडलेला असावा असा अंदाज आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदार करंबळेकर यांनी जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन केले. याप्रकरणी मेहुनबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान मृत अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन मेहुणबारे पोलिसांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज