धक्कादायक : अल्पवयीन मुलाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । रावेर शहरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मूलाला रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याचा  प्राथमिक अंदाज आहे. लोकेश महाजन ( वय १६ ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून, याप्रकरणी येथील पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रावेर शहरातील शिवाजी चौक येथील रहिवासी लोकेश सजंय महाजन (वय १६ ) हा सकाळ पासुन घरातून निघुन गेला होता. त्यांच्या कुटुंबियांनी त्याचा शोधा शोध केला असता त्याचा मृतदेह रावेर रेल्वे स्टेशन नजिक सापडला. अज्ञात रेल्वेच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज