भुसावळची टोळी हद्दपार करण्याच्या मागणीसाठी उद्यापासून बेमुदत उपोषण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । भुसावळ शहरातील प्रकाश गिरधर निकम हे टाेळी प्रमुख असल्याचा आरोप करत, त्यांच्या हद्दपारीचे आदेश पारित करावे, या मागणीसाठी नगरसेविका पूजा सूर्यवंशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून (दि. ३१) उपोषण करणार आहेत.

प्रकाश निकम यांच्या विरूध्द गेल्यावेळीही हद्दपारीचा प्रस्ताव हाेता. मात्र राजकीय दबावातून ताे प्रस्ताव रद्द केला गेला. आता शहरातून ज्या प्रकारे अन्य टाेळ्या हद्दपार करण्यात आल्या आहेत, त्याच धर्तीवर प्रकाश निकम यांनाही हद्दपार करावे, अशी मागणी पूजा सूर्यवंशी यांनी केली आहे. निकम यांच्या पत्नी राष्ट्रवादी पक्षाच्या जबाबदार पदाधिकारी आहेत. दबाव आणून त्या हद्दपारी रद्द करतात, असा आरोप करत सूर्यवंशी यांनी उपोषणाचा इशारा दिला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -