नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी… ५०० जागांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यात जिल्ह्यासह राज्यभरातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. इच्छूकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी केले आहे.

राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्रातील सर्व नामांकित कंपन्यांसह जिल्हयातील कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. सहभागी कंपन्यांकडून वेगवेगळया प्रकारची रिक्तपदे नोंदविण्यात आली आहेत. ९ वी, १० वी, १२ वी, ग्रॅज्युएट, डिप्लोमा, एम.ई, बी.ई, काम्प्यूटर ऑपरेटर, आय.टी.आयचे सर्व ट्रेड पात्रतेची एकूण ५०० रिक्तपदे भरण्याविषयी कळविण्यात आले आहे. पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशी करा येईल नोंदणी 

अल्पसंख्याक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेलया रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायेजना नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी व त्यानंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुन ॲप्लाय करावा. काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५) या वेळेत ०२५७-२९५९७९० या क्रमांकावर वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -