fbpx

धरणगावात बंद घर फोडले; अडीच लाखांचा ऐवज लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । कुटुंबिय घरी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी धरणगाव शहरातील मातोश्री नगरातील बंद घर फोडून घरातुन तब्बल अडीच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव शहरातील मातोश्री नगरात सुरेखा भदाने (वय-४८) हे कुटुंबीयांसह राहतात. त्या त्यांच्या कामानिमित्त दि.२८ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते २९ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. घरी कोणीच नसल्याने व घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील ५ हजार रुपयांची रोकड आणि २ लाख ४६ हजार ३२० रुपयांचे दागिने असा एकूण २ लाख ५१ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सुरेखा भदाणे यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज