जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । अमळनेर येथील गांधलीपुरा भागात किराणा दुकानांवर घेतलेल्या मालाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने तीन जणांनी दुकानदाराच्या डोक्यात बियरची बाटली मारली.तसेच चाकूने बोट तोडल्याची घटना ११ रोजी रात्री घडली.यातील ३ आरोपींना अटक करून न्यायालसमोर हजर केले असता १४ दिवसांची कोठडी सुनावली.
रवींद्र गोविंदराम सैनानी यांच्या गांधलीपुरा भागातील किराणा दुकानांवर पैलाड येथील रोशन राजेंद्र पाटील,यशवंत प्रकाश पाटील,विजय राजेंद्र पाटील हे तिघे दारू पिऊन दुकानात आले. त्यांच्या हातात बियरची बाटली होती. त्यांनी पाण्याची बाटली, कुरकुरे व सिगारेट मागितली. त्यानंतर ते तिघे तेथून निघून जात असताना मालक रवींद्र यांनी मालाचे पैसे मागितले. त्याचा राग आल्याने तिघांनी शर्टाची कॉलर पकडून दुकानदाराला शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. १३ रोजी तिघांना पोलिसांनी अटक करून न्यायालायासमोर हजर केले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर तिघांना जिल्हा कारगृहात पाठवण्यात आले.