fbpx

विहिरीत बुडून विद्यार्थांचा मृत्यू, एकुलता मुलगा गमावला

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२१ । १६ वर्षीय विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खु येथे उघडकीस आलीय. दिनेश तुकाराम चौधरी असे मृत मुलाचे नाव आहे. एकुलता एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबाने एकच आक्रोश केला.

याबाबत असे की, कुऱ्हाड खु येथील तुकाराम महारु चौधरी यांचा एकुलता एक मुलगा दिनेश तुकाराम चौधरी हा दुपारी २ वाजेपासून निदर्शनास न आल्याने गावातील त्याचे मित्र मंडळी व आई वडिलांनी शोध घेतला. गावा जवळील अनेक विहरी व पाझर तलावात शोध घेतल्यानंतर तुकाराम चौधरी यांच्या मालकीच्या शेतातील कुऱ्हाड बु” शिवारात विहीरीवर जाऊन पाहिले असता तो नजरेस न पडल्याने उपस्थितांमधील एकाने इलेक्ट्रिक मोटारीला बांधलेला दोर वर ओढून बघितला त्यावेळी चि. दिनेश हा इलेक्ट्रिक मोटार व दोरीच्या मध्ये मृत अवस्थेत अडकलेला आढळून आला.

एन पोळ्याच्या दिवशी अतिशय वाईट घटना घडल्याने व एकुलता एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दोन्ही गावात शोककळा पसरून गावकऱ्यांनी पोळा न साजरा करण्याचा निर्णय घेतला. दोन मुलींच्या पाठीवर झालेला एकुलता एक मुलगा वारल्याने आई वडिलांनी मोठा आक्रोश केला होता. दिनेश याच्यावर रात्री ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तो येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी होता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज