fbpx

बोदवमध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवले

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस अली आहे, याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. दरम्यान १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मुलीची परिसरात शोधाशोध केली परंतू आढळून आली नाही. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी बोदवड पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात बोदवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुधाकर शेजोळे करीत आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज