चाळीसगावातून १३ वर्षीय मुलास फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख। चाळीसगाव शहरातील आदित्यनगर येथे राहणाऱ्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलास अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना सोमवार दि.२९ रोजी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील आदित्य नगर येथे राहणारा योगेश छोटू कोळी (वय-१३) हा मुलगा रात्री गल्लीत खेळत असताना अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेले. हा प्रकार सोमवारी रात्री ७.३० ते ८:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुलाच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो मुलगा मिळून न आल्याने व कुणीतरी त्याचे अपहरण केले असावे, असा संशय आल्याने मुलाचे वडील छोटू तानाजी कोळी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३६३ प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -