fbpx

आंब्याच्या झाडाखाली मुलगा वेचत होता आंबा…वारा आला आणि आईच्या डोळ्यादेखत घडली अशी घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ । शेतातील आंब्याच्या झाडाखाली आंबे वेचत असताना अचानक आलेल्या वाऱ्यामुळे झाडाची फांदी तुटून अंगावर पडल्याने एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे घडलीय. मुलगा ओम ईश्वर साळुंखे (वय13) असे मृत मुलाचे नाव आहे.

याबाबत असे की, पिंपरखेड येथे ओम हा त्याच्या आईसोबत शेतात गुरांना चारा पाणी करण्यासाठी गेला होता. यावेळी त्यांचे गणेशपूर शिवारातील शेतातील आंब्याच्या झाडाखाली वादळामुळे आंबे पडलेले होते. त्याची आईसोबत आलेला ओम आंबे जमा करत होता तर आई काही अंतरावर बांधलेल्या गुरांना चारापाणी करत असतांना अचानक जोराचा वारा आला व त्यात आंब्याची मोठी फांदी तुटून आंबे वेचणाऱ्या ओमच्या अंगावर पडली व दुर्दैवाने त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याच्या आईच्या डोळ्यादेखत ही घटना घडली.

त्याच्या आईने आरडाओरड केली मात्र जवळपास मदतीला कोणीही नसल्याने त्या मातेने स्वतः आंब्याच्या फांदीखाली दबलेला एककुलता एक मुलगा बाहेर काढला व बेशुध्द अवस्थेत खांद्यावर घेत गावाकडे यायला निघाली पुढे काही अंतर चालून गेल्यावर जवळपासचे शेतकरी मदतीला धावून आले व ओमला चाळीसगाव येथील देवरे हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी उपराआधीच मृत असल्याचे घोषीत केले. एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्याने आईने हंबरडा फोडला

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज