शाहूनगरातून ९ वर्षीय बालक बेपत्ता

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । शहरातील शाहूनगर परिसरातील ९ वर्षीय बालक सोमवारी सकाळी ११.३० पासून बेपत्ता झाला आहे. तो सायकलवर घरातून गेला असून त्याला समज कमी असल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. मुलाचा तीन तासापासून शोध सुरू आहे.

शाहूनगरात राहणारा कुबेर राजकुमार मिश्रा (वय-९) हा आज सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास घराजवळ सायकल घेऊन फिरत होता. कुबेरला समज कमी असून तो सायकल फिरवत कुठेतरी निघून गेला आहे. कुबेरच्या सायकलवर प्रथम असे लिहिले असून त्याने अंगात पिवळा टीशर्ट आणि नाईट पॅन्ट घातलेली आहे.

गेल्या तीन तासापासून कुबेरचा कुटुंबियांकडून शोध सुरू असून तो मिळून आल्यास मो. 9860735743 किंवा मो. 9284716313 यावर संपर्क साधावा असे आवाहन पालकांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज