fbpx

जळगाव जिल्ह्यातील १०० लघुप्रकल्पांमध्ये अवघा ९ टक्केच जलसाठा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ । पावसाळा निम्मा संपत आला मात्र, जळगाव जिल्ह्यातील धरणसाठा अवघा ३८ टक्के असल्याने चिंता वाढली आहे. त्यातही शेती आणि ग्रामीण पाणीपुरवठा याेजनेचा मुख्य जलस्राेत असलेल्या शंभर लघुप्रकल्पांमध्ये अवघा ९ टक्केच जलसाठा आहे. मध्यम आणि माेठ्या प्रकल्पांवरच सर्व भिस्त असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात यंदा म्हणावा तितका चांगला पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात जुलै महिन्यात अधून मधून पावसाने हजेरी लावल्याने त्याआधारावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप पीक संकटात आले होते. परंतु गेल्या ३ दिवसापासून जिल्ह्यात पावसाने पुनरागम केल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात ५२ टक्केच पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठा अवघा ३८ टक्के असल्याने चिंता वाढली आहे.  अल्प पावसामुळे शेती आणि ग्रामीण पाणीपुरवठा याेजनांचा मुख्य आधार असलेल्या १०० लघुप्रकल्पांमध्ये केवळ ९ टक्के साठा शिल्लक आहे. तापी, वाघूर आणि गिरणेवरील माेठ्या ३ प्रकल्पांमध्ये पुरेसा, तर १३ पैकी काही मध्यम प्रकल्पांनी पन्नाशी ओलांडली आहे. दरम्यान, मंगळवार, बुधवारी पाठोपाठ गुरूवारी देखील जिल्ह्यात पाऊस झाला. तो १७.९ मिमी आहे.

प्रकल्पनिहाय जलसाठा

मध्यम प्रकल्प :

४८.२५ टक्के,
– अभाेरा १०० टक्के,
– मंगरूळ १०० टक्के,
– सुकी ९०.४६ टक्के,
– माेर ५३.८८ टक्के,
– हिवरा २.९० टक्के,
– अग्नावती ०० टक्के,
– बहुळा १४.४३ टक्के,
– ताेंडापूर ४३.४५,
– अंजनी २७.२६ टक्के,
– गुळ २८.४३ टक्के,
– भाेकरबारी १३.६६ टक्के,
– बाेरी ६०.६१ टक्के,
– मन्याड ३५.२ टक्के.
लघुप्रकल्प : ९.९० टक्के.

अशी आहे जिल्ह्यातील जलसाठ्यांची स्थिती
माेठे प्रकल्प : ४१.४२ टक्के,
– हतनूर- २१.२६ टक्के,
– गिरणा- ४१.३४ टक्के,
– वाघूर ६१.५७ टक्के.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज