जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२२ । एरंडोल येथे ७मे रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यात प्रलंबित प्रकरणात पैकी अठरा प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली तर ८३ वाद पूर्व प्रकरणे निकाली निघून जवळपास ९ लाख ५० हजार रुपयांची थकबाकी वसूल झाली. त्याच प्रमाणे सौम्य शिक्षा असणारी १५ प्रकरणे निकाली काढण्यात आली अशी एकूण ९८ प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी दिली.
या राष्ट्रीय लोक न्यायालयात तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती एम.एस.ई, बी, बी.एस.एन.एल, सेंट्रल बँक, स्टेट बँक, बडोदा बँक यांच्याकडील थकबाकीची प्रकरणे ठेवण्यात आली. लोक अदालत तिच्या यशस्वीतेसाठी एरंडोल वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट एम.ओ. का. बरे, सचिव डीबी महाजन, जेष्ठ विधी तज्ञ एकएम काळे, आरएम दाभाडे, पीएस बिर्ला आरआर सोनार, एजे सय्यद व इतर सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले ज्येष्ठ विधिज्ञ पीएस बिर्ला व व्हीएन पाटील यांनी पंच न्यायाधीश म्हणून कामकाज पाहिले तर प्रमुख पंच म्हणून न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी काम पाहिले.