एसटी महामंडळाची पुन्हा कारवाई, ९ कर्मचारी बडतर्फ आणि ४ निलंबित

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर, आता बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी जळगाव विभागातील ९ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून, ४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याला विरोध करणे आंदोलन भडकविणे आदी कारणांवरून सुरुवातीस निलंबनाची कारवाई केल्यानंतर या कर्मचाऱ्यांवर आता बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. जळगाव विभागात आतापर्यंत ५७ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने या कर्मचाऱ्यांवर बडतर्फ कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारी ९ कर्मचाऱ्यांवर पुन्हा बडतर्फीची कारवाई केल्यानंतर, एकूण आतापर्यंत ४६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -