fbpx

आजाराला कंटाळून ८१ वर्षीय वृद्धाची आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जून २०२१ । आजाराला कंटाळून एका ८१ वर्षीय वृद्धाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे घडली. एकनाथ बाबुराव पाटील (वय-८१)  असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव असून याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, किनगाव येथील एकनाथ पाटील हे शेतात जावून येतो असे सांगून सोमवारी ७ जून रोजी सकाळी ११ वाजता घरातून बाहेर पडले. सायंकाळी उशीरापर्यंत ते घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी ८ जून रोजी कासारखेडा शिवारातील रविंद्र पाटील यांच्या शेतातील विहिरीत त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्याचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसून आला. यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात शविविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना पोटाचा आजार होता. हा आजार असहाय्य झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज समोर येत आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज