fbpx

रिक्षाच्या धडकेत ८० वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । रिक्षाच्या जोरदार धडकेत ८० वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना जळगावातील समता नगरातील गुरूकृपा डेअरीजवळ घडलीय. गंगूबाई जयसिंग जाधव (वय-८०) असे जखमी वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगूबाई जाधव या समता नगरातील हमाल नगरात आपल्या कुटुंबियांसह राहतात. बुधवारी १२ मे रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास वृध्द महिला इस्त्री करण्यासाठी लागणारे कपडे घेण्यासाठी घराबाहेर पडल्या. समता नगरातील गुरूकृपा डेअरी जवळून जात असतांना समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षा (क्रमांक एमएच १९ व्ही ७१८) ने त्यांना जोरदार धडक दिली.

त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून हा फॅक्चर झाला आहे. अपघात होताच रिक्षाचालक रिक्षा घेवून पसार झाला आहे. आजूबाजूच्या नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले. गंगूबाई जाधव यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण जगदाळे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज