fbpx

जळगाव शहरात पुन्हा ८ दुकान सील

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जळगाव शहरात आज पुन्हा ८ दुकानदारांवर पालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई करून दुकाने सील करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये सकाळी ११ पर्यंतच अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. पण काही दुकानदार नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील ८ दुकाने सील करण्यात आली आहे. त्यात गृहसंसार प्रोव्हिजन, बाबा हरदास ट्रेडर्स, दाणा बाजारमधील मे विजयकुमार रामदास, मे बिरदिचंद धनराज बरडिया, कीर्ती ट्रेडर्स, महाराष्ट्र टूल्स आणि हार्डवेअर, अमृतकर किराणा आणि अनिल ट्रेडिंग कंपनी या दुकानांवर सीलबंदची कारवाई करण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज