fbpx

शुभवार्ता : जिह्यातील ८ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, हतनूर, गिरणा, वाघूर समाधानकारक

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२१ । गणरायाचे सर्वत्र जल्लोषात आगमन झाले असून बाप्पा सर्वांसाठी शुभ वार्ता घेऊन आले आहे. गेल्या पंढरवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील १३ पैकी ८ मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. तसेच हतनूर, गिरणा, वाघूर धरणात देखील समाधानकारक उपयुक्त पाणीसाठा आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आज हतनूर धरणात ४९ टक्के, गिरणा धरणात ५४ टक्के तर वाघूर धरणात ९४ टक्के उपयुक्त पाणी साठा जमा झाला आहे. जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पापैकी ८ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

ओव्हरफ्लो झालेल्या प्रकल्पात अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, बोरी आणि मन्याड प्रकल्पाचा समावेश आहे. तसेच मोर, बहुळा, अंजनी प्रकल्प पूर्ण भरण्याच्या स्थितीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज