चाळीसगाव डेपोच्या 75 टक्के बस बंद, शंभरावर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । एसटीला राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी चाळीसगाव एस टी डेपोच्या कर्मचारी दि 7 पासून बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. सकाळी 11 वाजेपासून जवळपास शंभरावर चालक, वाहक व इतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने सायंकाळपर्यंत 75 टक्के बस बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले.

यावेळी आंदोलनस्थळी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी भेट देऊन राज्य सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले खासदार म्हणाले की एस टी चे चालक वाहक सर्वसामान्य जनतेला सुरक्षित घरी पोहोचवतात आज त्यांची अवस्था वाईट आहे 33 कर्मचारी आत्महत्या करतात तरी देखील राज्य शासनाला जाग येत नाही असे म्हणून परिवहन मंत्री व मुख्यमंत्री यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत एस टी कर्मचारी यांना जी वाढ द्यायची आहे ती घरून द्यायची नसून शासनाच्या तिजोरीतून म्हणजेच कराच्या पैशातून द्यायची आहे.

आमदारांच्या निधीत कोटीने वाढ करायला शासनाकडे पैसा आहे असे म्हणत राज्यकर्ते भानावर नाहीत यांचे जनतेच्या हाताकडे लक्ष नाही हे गंजडी व संवेदनहीन सरकार आहे मुख्यमंत्री महोदय स्व बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला काळिमा फासणारा सुपुत्र जन्माला आला काय हा प्रश्न राज्याच्या जनतेपुढे आला आहे असा घणाघात त्यांनी केला असून एस टी ला राज्य शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज