अबब… एमआयडीसीतील कंपनीतून‎ ७०० लिटर डिझेल चोरी‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । उमाळा शिवारात असलेल्या स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल या कंपनीतून ६५ हजार ८०० रुपये किमतीचे ७०० लीटर डिझेल चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार २७ डिसेंबर रोजी उघडकीस आला आहे. या प्रकरणी येथील कर्मचारी यांचा फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

कंपनीतील जनरेटरसाठी डिझेल मागविण्यात आले होते. ते जनरेटर यंत्राला लागूनच असलेल्या खोलीत साठवून ठेवण्यात आले होते. त्या खोलीची कडी व कुलूप तोडून चोरट्यांनी डिझेलची चोरी केली. कर्मचारी गजानन लोटन सांगळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार गफूर बदती करीत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -