जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२४ । पारोळा तालुक्यातील शिवरे येथे गणेशोत्सवनिमित्त सारंग माध्यमिक विद्यालयात भंडारा देण्यात आला. त्यातून शाळेतील ७० विद्यार्थी व चार शिक्षकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आलीय. त्यापैकी दोन विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
शिवरे येथील सारंग माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवनिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम घेण्यात आला. भंडाऱ्यात डाळभात, मटकीची भाजी व गुलाबजाम असा मेन्यू होता. सर्व विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर अचानक अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. काहींना उलट्याही झाल्याने धावपळ उडाली.
यात १२ ते १५ वयोगटातील एकूण ७० विद्यार्थी व चार शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तामसवाडी प्राथमिक उपकेंद्राच्या वैद्यकीय पथकांसह शहरातील काही खासगी डॉक्टरांनी देखील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले. उपचारनंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले तर काही वर अद्यापही उपचार सुरू आहेत