दुर्दैवी : रोझोदा येथील चिमुकलीचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । सावदा येथून जवळच असलेल्या रोझोदा येथे एक सहा वर्षीय चिमुकलीचा गोबर गॅसच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी घडली. परी पुष्कर फेगडे (वय ६) असे या मृत चिमुकलीचे नाव असून या घटनेमुळे एकच शोककळा पसरली

याबाबत असे की, रोझोदा येथील परी फेगडे ही मुलगी दुपारी 1 वाजे दरम्यान गोबर गॅसच्या  कुंडाजवळ गेली असता त्यात ती पडली. कुंड खोल असल्याने व दुपारचे वेळेस समोर कोणी नसल्याने ती या कुंडात बुडाली. घटना समजेपर्यंत खुप उशीर झाला व यात दुर्दैवाने तिचा मृत्यु झाला.

ती जे. टी. महाजन शाळेत इयत्ता दुसरीत शिकत होती. तिचे पश्च्यात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार असून या घटनेमुळे येथे एकच शोककळा पसरली, ती लक्ष्मण ज्ञानदेव फेगडे यांची नात होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज