fbpx

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगावात वृक्ष लागवड

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर युवासेना जळगांव महानगर जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे व विधानसभा क्षेत्र प्रमुख मिलिंद शेटे यांच्या मागदर्शनखाली  युवासेना विभाग प्रमुख अमोल मोरे व तेजस दुसाने तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ५५ कडुलिंबाच्या रोपांचे रोपण करण्यात आले. याची सुरवात धनाजी नाना महाविद्यालय, शंकरराव नगर येथे करण्यात आली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  विष्णुभाऊ भंगाळे (शिवसेना जिल्हाप्रमुख, जळगांव),  किशोरभाऊ भोसले (युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य), शरदआबा तायडे (शिवसेना महानगर प्रमुख), नगरसेवक कुंदन काळे, भालचंद्र चौधरी(समाजसेवक), प्रशांत(अप्पा)भंगाळे, युवासेना जिल्हा सरचिटणीस राहुल पोतदार, जिल्हा समन्व्यक जितू बारी, उपजिल्हायुवा अधिकारी पियुष गांधी, विधानसभा क्षेत्र प्रमुख मिलिंद शेटे, विद्यापीठ संपर्क युवा अधिकारी अंकित कासार, महानगर युवा अधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, महानगर समन्व्यक संकेत कापसे, निलेशआप्पा सपकाळे, उपमहानगर युवा अधिकारी सागर हिवराळे,गिरीश सपकाळे, हितेश ठाकरे, विभाग अधिकारी अमोल मोरे, तेजस दुसाने, चेतन कापसे, गौरव चौधरी, सागर गुरव, ललित भाऊ कोतवाल  युवासैनिक गौरव बडगुजर, राजेश काळे, अक्षय भिरूड, मिलिंद खडसे, नितीन कुवर, पंकज सोनार, सुरेशभाऊ फालक आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt