पथराळे येथील ५२ वर्षीय प्राैढाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । पथराळे (ता.यावल) येथील ५२ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि.८ रोजी सायंकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील पथराळे येथील रहिवाशी गोपाळ सोनू धीवर (वय-५२), हे कुटुंबियांसमवेत वास्तव्यास आहेत. बुधवार दि.८ रोजी त्यांची पत्नी, मुलगा व सून बाहेरगावी गेल्याने ते घरी एकटेच होते. दरम्यान, सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या पुतण्याने घराबाहेरून त्यांना आवाज दिला. मात्र घरातून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने घरात जाऊन पाहिले असता गोपाळ धीवर हे गळफास घेऊन मृतावस्थेत दिसून आले. याबाबत पोलिसांना माहिती देऊन मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. याठिकाणी डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून तपास हवालदार विजय पाचपोळ करत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -