शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा : अतिवृष्टीचे चुकून आलेले ५० हजार केले परत‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । अतिवृष्टीचे जास्तीचे आलेले ५० हजार‎ रुपयांचे अनुदान, जवखेडेसिम (ता.एरंडोल) येथील‎ शेतकऱ्याने २९ रोजी प्रामाणिकपणे प्रशासनाला परत केले.‎ शेतकऱ्याच्या प्रामाणिकपणाचे कौतूक होत‎ आहे.‎ गोरखनाथ‎ माधवराव भदाणे असे शेतकऱ्याचे नाव आहे.

शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना‎ अतिवृष्टीचे अनुदान बँक खात्यांद्वारे‎ वितरीत केले जात आहे. जवखेडेसिम‎ (ता.एरंडोल) येथील शेतकरी गोरखनाथ‎ माधवराव भदाणे यांच्या, जिल्हा बँकेच्या‎ निपाणे शाखेतील खात्यावर एक‎ महिन्यापूर्वी ५० हजारांची रक्कम चुकून‎ जमा करण्यात आली होती. गोरखनाथ‎ भदाणे यांनी एरंडोल तहसीलदार सुचिता‎ ‎ चव्हाण, ताडे येथील तलाठी मुंडे व‎ जवखेडेसिमचे सरपंच दिनेश पाटील‎ (आमले) यांच्याशी संपर्क साधून‎ प्रशासनाकडून झालेली चूक लक्षात आणून‎ दिली. तसेच शेतकरी गोरखनाथ भदाणे व‎ त्यांचा मुलगा बी.एस.एफ. जवान‎ विजयकुमार भदाणे यांनी, ही रक्कम‎ प्रशासनाला परत करण्याचा निर्णय घेतला.‎ २८ डिसेंबरला बँक खात्यात जमा झालेली‎ रक्कम पिता-पुत्राने काढून बुधवारी‎ प्रशासनाला परत केली.

त्यामुळे‎ प्रशासनाकडून एरंडोल तहसीलदार सुचिता‎ चव्हाण यांनी गोरखनाथ भदाणे यांचा‎ तहसील कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन‎ सत्कार केला. शासनाकडून चुकून आलेली‎ रक्कम परत केल्याबद्दल गोरखनाथ भदाणे‎ यांचे गावात व परिसरात कौतूक होत आहे.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -