यावलमधील स्वामी समर्थ नगरात ५० हजाराची घरफोडी ; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । यावल शहरात स्वामी समर्थ नगरमध्ये एका घराचे लोखंडी व लाकडी दरवाज्याचे कडी,कोंडी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून ५० हजार रुपयाचा ऐवज चोरून गेल्याची घटना आज उघडकीस आली. यामुळे संपूर्ण स्वामी समर्थ नगर व यावल शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, शहरातील स्वामी समर्थ नगरमध्ये चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरात आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून रोख 6 हजार, सोन्याची पोत,चांदीचे कडे, चांदीच्या साखळ्या असा एकूण 47 हजार 400 रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत यावल पोलीस स्टेशनला तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची घटना आज दि.13रात्री घडली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत सेवानिवृत्त कंडक्टर कांतीलाल ठानसिंग पाटील वय 62 यांनी म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पठान हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज