fbpx

वीज खांबात उतरला वीजप्रवाह, चिमुकली जागीच ठार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२१ । चोपडा तालुक्यातील वर्डी येथे घराजवळ असलेल्या वीज खांबात विद्युत प्रवाह उतरला होता. घरातील ५ वर्षीय चिमुकलीने खांबाला स्पर्श केल्याने शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.

वर्डी गावातील बैरम नगर भागातील रहिवासी धर्मा नांजी बारेला यांची लहान मुलगी अंगिता वय- ५ वर्ष ही घराजवळ खेळत असताना घराजवळ असलेल्या विजेच्या खांबाला स्पर्श होऊन ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. ही घटना तिच्या बाबा नानजी बारेला यांच्या लक्षात आली. सावध पवित्रा घेऊन लाकडाच्या साहाय्याने तिला दूर केले. डॉक्टरांना बोलून अंगीताची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी मृत्यू झाल्याचे सांगितले.

अंगीताच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ, दोन बहिणी, आजी, बाबा असा गरीब परिवार आहे, घरात सर्वात लहान असल्याने अंगीता सर्वांची लाडकी लेक होती. आदिवासी बांधव कुटूंबातून अंगीताचा मृत्यूमुळे बैरम नगर परिसरात व गावात हळहळ व्यक्त होत आहे . प्रकाश  बारेला यांच्या खबरी वरून अडावद पोलीस स्टेशनचे कर्मचारी फारूक तडवी, कॉन्स्टेबल अरणाडे, पोलीस पाटील पद्माकर नाथ यांनी घटनास्थळी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले पुढील तपास अडावद पोलिस स्टेशनचे पीएसआय किरण दांडगे हे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज