धक्कादायक : ५ वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । खेळण्याच्या बहाण्याने पाच वर्षीय मुलीवर १५ वर्षीय मुलाने चार ते पाच वेळा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन रविवारी रात्री ११ वाजता पंधरा वर्षीय मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले.

शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाने त्याच्या घरासमोरच्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार पीडितेने भावाला सांगितल्यानंतर वडिलांनी विचारपूस केली असता तिने झाल्याप्रकाराची माहिती दिली. यावरून कुटुंबीयांनी संशयिताला घरी जाऊन जाब विचारला असता त्याने तसेच त्याच्या कुटुंबीयांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वडिलांनी पीडितेला घेऊन शनिपेठ पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली.

शनीपेठ पोलिसात याप्रकरणी संशयित मुलाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी रविवारी रात्री मुलाला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -