नशिराबाद नगरपरिषदेला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । शासनाच्या सहाय्य योजनेच्या माध्यमातून नशिराबाद नगरपरिषदेसाठी पाच कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय नगरविकास खात्याने जाहीर केला आहे. चार कोटी रूपयांमधून नगरपरिषदेची अद्ययावत प्रशासकीय इमारात उभारण्यात येणार असून एक कोटी रूपयांचा निधी स्मशानभूमीसाठी प्रदान करण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार निवडणुकीच्या आधीच नशिराबादकरांना विकासकामांसाठी निधीची भेट दिली आहे.

नशिराबाद येथील ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपरिषद स्थापन करण्यात आली आहे. जिल्हातील अन्य नगरपालिकांसोबत नशिराबाद येथेही निवडणूक होणार आहे. नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहराच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार नशिराबाद येथे अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय, रस्ते आणि गटारींसाठी निधी प्रदान करण्यात येत असून गेल्या आठवड्यातच नशिराबाद ते सुनसगाव या रस्त्याचे विस्तारीकरण आणि डांबरीकरणास प्रारंभ करण्यात आलेला आहे. त्यानंतर नगरपंचायतीची अद्ययावत प्रशासकीय इमारत व स्मशानभूमी उभारण्यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे.

नशिराबाद नगरपंचायतीला निधी मंजुर झाल्याचे समजताच शिवसेना, युवासेना व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर, चंदु भोळे, विकास पाटील, यूवासेना शहरप्रमुख चेतन बर्‍हाटे, आप्पा धर्माधिकारी, आबा माळी, महेंद्र कोळी, कैलास नेरकर, बंडु रत्नपारखे, नितीन बेंडवाल, बापु चौधरी, सुनिल महाजन, मोहन कोलते, मनोज देशमुख, दिनेश माळी, सोहन पाटील, सतिश रोटे, भुषण कोल्हे, हरीष येवले, पांडु बाविस्कर, मयुर देवरे, शुभम सोनार, आबा सोनार, निलेश धनगर, विशाल सोनवणे आदी उपस्थित होते.

शहरातील विकासकामांना गती
या संदर्भात बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, नशिराबादचा कायापालट करण्याचे जाहीर अभिवचन येथील नागरिकांना दिले असून या अनुषंगाने शहरातील विकासकामांना गती प्रदान करण्यात आली आहे. निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदेसाठी अद्ययावत इमारत असावी, असा विचार आपण आधीच मांडला होता, त्याची पूर्तता झाली आहे. सर्व सुविधांयुक्त स्मशानभूमीची मागणी देखील कधीपासूनच करण्यात येत होती. हे काम देखील आता मार्गी लागणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकार्य लाभल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज