fbpx

बोरी येथे ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । पारोळा तालुक्यातील बोरी येथे ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीला आले आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील बोरी येथील ४५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह राहते. गावातील दिलीप पुंडलिक निकम हा १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास महिलेच्या घरात अनधिकृतपणे घुसला व महिलेशी अंगलट करत तिचा विनयभंग केला. दरम्यान तिला मारहाण करून शिवीगाळ देखील केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात दिलीप निकम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज