थैलेसीमिया शिबिरात ४४७ लोकांनी घेतला लाभ

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । अखंड सिंधी सेवा फाउंडेशन आणि नीरजरा फाऊंडेशन व नेत्र ज्योती हॉस्पिटल यांच्या वतीने संत कवराम नगर येथे थैलेसीमिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात ४४७ लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. थॅलेसेमिया हे शिबिर थदारामजी तोलानी यांना समर्पित होते.

सविस्तर असे कि, संत कवराम नगर येथे अखंड सिंधी सेवा फाउंडेशन आणि नीरजरा फाऊंडेशन व नेत्र ज्योती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामाने थैलेसीमिया,डोळे, दंत व रक्तदान या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १७७ लोकांची थैलेसीमिया तपासणी करण्यात आली. तर 190 लोकांनी डोळ्यांची तपासणी केली. आणि 20 जणांनी रक्तदान केले, व 60 लोकांनी दंत तपासणी करून घेतली. असे एकूण ४४७ लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. तसेच यासाठी थायरोकेअर आणि माधव गोळवलकर रक्त स्वयंसेवी रक्तपेढी यांनी आरोग्याशी संबंधित सेवा संस्थेला हातभार लावला होता.

यांचे सहकार्य लाभले 

शिबिरात अमूल्य सहकार्य, पूज्य जळगाव सेंट्रल पंचायत आणि संत कंवरराम ट्रस्ट, व सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले. थॅलेसेमिया शिबिर हे थदारामजी तोलानी यांना समर्पित होते. ज्यांनी थॅलेसेमियाबद्दल देशात जनजागृती केली आणि देशभरात 50 हून अधिक शिबिरे घेतली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज