वाळूमाफियांना दणका, महसूल विभागाने पकडले ४ वाहने

बातमी शेअर करा


जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । रावेर‎ तालुक्यातील मोरगाव-खिरवड रस्त्यावरील नाल्यातून अवैधरीत्या‎ गौण खनिजाची वाहतूक सुरू होती. दरम्यान, तहसीलदार ‎देवगुणे व महसूल पथकाने धडक कारवाई केली. त्यात वाळूची ‎भरलेली चार ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेतल्या आहेत.‎ या‎ कारवाईबाबत परिसरात समाधान व्यक्त केले‎ जात आहे.

सविस्तर असे की, सोमवारी रात्री ९:३० वाजेच्या‎ सुमारास मोरगाव -खिरवड‎ रस्त्यावरील नाल्यातून अवैधरीत्या‎ वाळू वाहतूक होत असल्याची‎ माहिती महसूल विभागाला‎ मिळाली. त्यानुसार तहसीलदार‎ देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली‎ मंडळ अधिकारी विठोबा पाटील,‎ जी.एन.शेलकर, जी.डी. बंगाळे,‎ सचिन पाटील, सुधीर सोनवणे व‎ तलाठी असे सुमारे १५ जणांच्या‎ पथकाने ही कारवाई केली आहे.‎ अवैध वाळूची वाहने असलेल्या‎ ठिकाणी रात्रीच तहसीलदार‎ उषाराणी देवगुणे पोलिसांना सोबत‎ घेत पोहचल्या व ही धडक कारवाई‎ केली. यामुळे गौण खनिज‎ वाहतूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मात्र वाळू‎ भरण्यासाठी जेसीबीच्या वापर होत‎ होता. परंतु कारवाईची सुगावा‎ लागल्याने ते पसार झाले.‎ सोमवारी रात्री १० वाजेच्या‎ सुमारास महसूल पथकाने घटना‎ स्थळावरून वाळूने भरलेल्या चार‎ ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेतल्या आहेत.‎ त्यात एमएच १९ एएन २४४७,‎ एमएच १९ टी १६३०, स्वराज्य नवीन‎ ट्रॅक्टर विना नंबर, एमएच १९ सीवाय‎ १६४१ या क्रमांकाची वाहने जप्त‎ करण्यात आली.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -