fbpx

मध्य रेल्वेने भंगारातून कमविले तब्बल ‘इतके’ कोटी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२१ । प्रत्येक विभाग, कार्यशाळा व शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने ‘झिरो स्क्रॅप मिशन’ सुरू केले आहे. कोविड-१९चा संसर्ग सुरू असूनही मध्य रेल्वेने २०२०-२१ या वर्षात ३५० कोटी रुपयांचे लक्ष्य ओलांडत ३९१.४३ कोटी रुपयांचे भंगार विकले आहे. हे स्क्रॅप १५ वर्षांतील सर्वाधिक आहे.

भंगार विक्रीतून रेल्वेचा केवळ महसूल निर्माण करणे हाच एकमेव उद्देश नाही. अशा विक्रीमुळे परिसराची देखरेख चांगल्या प्रकारे होते. तसेच विविध ठिकाणी असलेले व निवडण्यात आलेले सर्व भंगार साहित्य विकण्यासाठी मध्य रेल्वे मिशन मोडमध्ये काम करेल, असे मत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटींनी व्यक्त केले.

या स्क्रॅप प्रक्रियेत रेल्वेला यंदा ३९१.४३ कोटींची कमाई करता आली. सन २०२१-२२ हे लक्ष्य ४०० कोटी रुपये आहे. त्यानुसार आतापासूनच मध्य रेल्वेच्या सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज