जळगावकरांनो अलर्ट : जिल्ह्यात आज आढळले तब्बल ३९ पॉझिटिव्ह रुग्ण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह बाधितांची संख्या दोन दिवसांपूर्वी दहावर गेल्यानंतर आज पुन्हा मोठा आकडा समोर आला आहे. आज जिल्ह्यात दिवसभरात नव्या ३९ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर – १७, भुसावळ तालुक्यात – ९, अमळनेर – १, चोपडा – ३, एरंडोल – ४ चाळीसगाव – ५ असे एकूण ३९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९८.१८ टक्के
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १ लाख ४२ हजार ९०६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३६ बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत २ हजार ५७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या ७९ आहे. आज जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९८.१८ टक्के आहे.

हेही वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -