⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | ३६ विद्यार्थ्यांना मिळाली परीक्षेची अतिरिक्त संधी, ४ फेब्रुवारी अंतिम मुदत

३६ विद्यार्थ्यांना मिळाली परीक्षेची अतिरिक्त संधी, ४ फेब्रुवारी अंतिम मुदत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । परीक्षेची संधी संपलेल्या बीएसस्सी, एमएसस्सीच्या ३६ विद्यार्थ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने नुकतीच अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्याचे अतिरिक्त शुल्क भरण्याची ४ फेब्रुवारी ही अंतिम मुदत महाविद्यालयांना देण्यात आली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यातंर्गत बीएसस्सी, एमएसस्सी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यात विद्यापीठाकडे ऑनलाईन प्राप्त झालेल्या परीक्षा अर्जाची पहिल्या टप्प्याच्या छाननीमध्ये ज्या विद्यार्थ्याच्या परीक्षेच्या संधी संपलेल्या आहेत, अशा विज्ञान शाखेच्या ५५ विद्यार्थ्यांचे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेकरीता परीक्षा अर्ज केले असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले. त्यात बीएसस्सीच्या ३८ व एमएसस्सीचे १७ अर्जाचा समावेश होता.

मात्र, अतिरिक्त संधी मंजूरनसतना नियमित परीक्षा शुल्क व परीक्षा अर्ज ऑनलाईन सादर केल्यामुळे ऑनलाईन प्रणालीद्वारे या विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश पत्रे निर्गमित झाली. अखेर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, या विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय प्रभारी कुलगुरूंनी घेतला आहे.

अन्यथा होणार नाही निकाल जाहीर

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नुकतीच संधी मिळालेल्या व संधी नाकारलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार बीएसस्सीच्या २५ विद्यार्थ्यांना अतिरिक्त परीक्षेची संधी मिळाली असून १३ जणांना नाकारण्यात आली आहे. त्याचबरोबर एमएसस्सीच्या ११ विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. तर ६ जणांना नाकारण्यात आली आहे. दरम्यान, आता महाविद्यालयांना ४ फेब्रुवारीपर्यंत शुल्काची रक्कम विद्यापीठात सादर करावयाची आहे. ज्या विद्याथ्र्यांनी अतिरिक्त शुल्काची रक्कम मुदतीत जमा केली नाही, असे विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले तरी त्यांचे निकाल जाहीर केले जाणार नाहीत, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह