fbpx

होय… भाजपचे ३० नगरसेवक फुटले… कुलभूषण पाटलांसह ३३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । चेतन वाणी | शहरातील भाजप, एमआयएमचे नगरसेवक कालपासून गायब असून सोमवारी सकाळी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी देखील जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जळगाव मनपात सत्तांतर करण्याच्या हालचाली जोरात सुरू असून मुंबईहुन सर्व सूत्रे हलवली जात आहे. जळगाव लाईव्ह न्यूजकडे भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी गौप्यस्फोट केला असून सर्व सूत्रे कशी हालली याची माहिती दिली आहे.

आठ दिवसांपूर्वी झाली मुख्यमंत्र्यांकडे बैठक

जळगावचे आमदार राजुमामा भोळे हे नेहमी दुजाभाव करतात, आमदार निधीतील कामे देत नाही, सर्वांना विश्वासात घेत नसल्याने कंटाळून काही भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. आठ दिवसापूर्वी नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, चेतन सनकत, गजानन देशमुख, सुधीर पाटील, कुंदन काळे यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर याबाबत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी देखील याविषयी चर्चा करण्यात आली होती.

जयश्री महाजन महापौर, कुलभूषण पाटील उपमहापौर

शिवसेनेने खेळलेला डाव यशस्वी झाला तर शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे कुलभूषण पाटील हे उपमहापौर म्हणून निश्चित मानले जात आहे. भाजपातून शिवसेनेत जात असलेले भाजप नगरसेवक सध्या मुंबईत असून त्यांनी आमदारांबद्दल असलेली यापूर्वीच पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली होती. वरिष्ठांनी निर्णय न घेतल्याने त्यांनी गेल्या महिन्यात देखील मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याची माहिती नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना दिली आहे.

 हे देखील वाचा : 

बिग ब्रेकिंग : जळगावात राजकीय उलथापालथ : माजी मंत्री आ.गिरीष महाजन मुंबई रवाना!

महापौर निवडणुकीत ट्विस्ट : शिवसेनेने दाखल केला उमेदवारी अर्ज

जळगाव महानगरपालिकेत विरोधकांचा घोडेबाजार; गिरीश महाजनांची टीका

महाजनांच्या ‘मैत्री’खातर ललित कोल्हे सेनेच्या वाटेवर!

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज