भडगाव येथे ३२, तर गुढे येथे ५० हजार रुपयांच्या ऐवजवर चोरट्यांचा डल्ला

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ नोव्हेंबर २०२१ । भडगाव शहरातील उज्ज्वल कॉलनी व गुढे येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरातून ३२ – ५० हजार रुपयांचा ऐवज चाेरट्यांनी लांबविल्याची  घटना ६ रोजी सायंकाळी ते ७ रोजी पहाटेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी देवेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरुन भडगाव पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, भडगाव शहरातील उज्ज्वल कॉलनीतील टेलर काम करणारे देवेंद्र निंबा पाटील ( वय ३४ ) यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरातून ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, २ ग्रॅमचे कानातील व १ ग्रॅमची बाळी व रोख ५ हजार असा एकूण ३२ हजार रुपयांचा ऐवज चाेरट्यांनी लांबवला. ही घटना ६ रोजी सायंकाळी ते ७ रोजी पहाटेच्या दरम्यान घडली. याबाबत देवेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरुन भडगाव पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक प्रल्हाद शिंदे करत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत गुढे येथील शिक्षक संदीप भानुदास पाटील यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चाेरट्यांनी कपाटातून १० ग्रॅमची मंगल पोत, ५ हजार रुपये रोख, २० रुपये किंमतीची चांदी असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. या घटनेचा तपास हेड काॅन्स्टेबल नीलेश ब्राह्मणकर करत आहेत. दरम्यान, पोलिस निरीक्षक अशोक उतेकर व पोलिसांनी शहर व ग्रामीण भागातील सर्वच सोशल मीडियावर गावाला जातांना घ्यायची काळजी म्हणून जनजागृती केली आहे. तसेस रात्री पोलिस गस्त वाढवली आहे. मात्र, नागरिकांचे दुर्लक्ष हाेत असल्याचे या घटनांवरुन दिसते. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे पाेलिसांनी कळवले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज