fbpx

आजपासून जळगाव जिल्ह्यातील ३०६ माध्यमिक शाळा पुन्हा गजबजणार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. दरम्यान, राज्यातील कोरोनामुक्त गावांमधील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्याने आज १५ जुलैपासून जळगाव जिल्ह्यातील ७०८ माध्यमिक शाळांपैकी ३०६ शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, ग्रामपंचायतींचा ठराव आणि पालकांच्या संमतीशिवाय शाळा सुरू करण्यात येऊ नये, अशा सूचना शासनाने केल्या होत्या. त्यानुसार शिक्षण विभागाने कोरोनामुक्त गावातील शाळांकडून ठराव मागविले होते. जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्त गावांमध्ये ७०८ शाळा आहेत. त्यापैकी ३०६ शाळांनी प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास तयारी दर्शविली आहे. त्या शाळांचे ठराव बुधवारी शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. दरम्यान, आज गुरुवारी शाळा उघडणार आहे. परिणामी, गेल्या दीड वर्षापासून ओसाड पडलेल्या शाळा गजबजलेल्या पाहायला मिळतील.

दरम्यान, ७०८ शाळांमध्ये १ लाख ६८ हजार ६७० विद्यार्थी शाळेत येतील. त्यात ९ हजार ४५ शिक्षक यांच्या उपस्थितीच्या अनुशंगाने कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत शाळांना कळवले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt