गोरक्षगंगा नदीवरील कुंड धरणासाठी ३० कोटीचा निधी

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा येथील गोरक्षगंगा नदीवर असलेल्या कुंड धरणासाठी जलसंपदा विभागाकडुन सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

युती शासनाच्या काळात माजी आ.एकनाथ खडसे पाटबंधारे मंत्री असतांना त्यांच्या प्रयत्नांमुळे जोंधनखेडा गावाजवळ गोरक्षगंगा नदीवर कुंड धरणाची निर्मिती करण्यात आली होती. या धरणसाठ्यामुळे कुऱ्हा, पारंबी, काकोडा, हिवरा यासह परिसरात शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. परंतु अनेक वर्षांपासून या धरणाच्या भिंतीच्या उंची वाढवावी व सांडव्याचे अपुर्ण राहीलेले काम पुर्ण करण्यात यावे, अशी मागणी नागरीकांकडून होत होती.

नागरिकांची होणारी मागणी लक्षात घेऊन आणि जिल्ह्यातील इतर प्रकल्प मार्गी लागावे, यासाठी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहीणी खडसे-खेवलकर यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचेकडे जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने २० रोजी मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत रोहीणी खेवलकर यांनी इतर सिंचन योजनांबरोबर कुंड धरणाची उंची वाढविण्यासाठी व सांडव्याचे अपुर्ण काम पुर्ण करण्यासाठी सुधारीत प्रशासकिय मान्यता व निधी मिळण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार जोंधनखेडा लघु पाटबंधारे योजनेस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून या प्रकल्पास जलसंपदा विभाग दरसुची २०१६-१७ वर आधारीत ३०.८४ कोटी किमतीत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे धरणाचे अपुर्ण काम पुर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज