साठवण तलावाच्या कामात अपहार; भाजपातर्फे उपोषण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल येथील साठवण तलावाच्या कामात अपहार झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली.या समितीला ३० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश होते. मात्र, समितीने अजूनही चौकशी न केल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारपासून यावल तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले.

दरम्यान, उपोषणकर्त्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, तलावाच्या कामात अपहार झाल्याबाबत भाजपने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला होता.त्यानुसार या कामात १ कोटी ८० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे. नगराध्यक्षांनीही कामात भ्रष्टचार झाल्याचा आरोप केला होता. समिती स्थापन करूनही चौकशी झाली नाही. जनतेला न्याय मिळावा यासाठी उपोषण सुरू केल्याचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहर अध्यक्ष नीलेश गडे, नगरसेवक डॉ.भाजपने भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.कुंदन फेगडे, युवा शहराध्यक्ष रितेश बारी आदींनी सांगितले.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -