व्यापाऱ्यांवरील दंडात्मक कारवाई मागे घ्या : कॅट संघटना

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन नियमावली लागू करताना व्यापाऱ्यांवरील दंडात्मक कारवाई मागे घ्यावी,अशी मागणीचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना कॅट संघटनेने केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन नियमावली लागू करताना ग्राहकाने मास्क घातलेले नसल्यास दुकानदारांना १० हजारांचा दंड भरावा लागणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. अगोदरच कोरोनामुळे पावणेदोन वर्षांपासून व्यापार डबघाईस आला. आता तो पूर्वपदावर येत असताना पुन्हा नवीन नियमावली लागू करताना व्यापाऱ्यांवर ग्राहकांच्या चुकीचा भार टाकला जात आहे.

दुसऱ्याच्या चुकीचा भार व्यापाऱ्यांनी का सहन करावा, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे ग्राहकांनी मास्क घातलेले नसल्यास त्याचा भार व्यावसायिकांवर टाकू नये, व्यापाऱ्यांवरील भाराचा हा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी कॅट संघटनेने केली आहे.

निवेदनावर संघटनेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, राज्य उपाध्यक्ष दिलीप गांधी, राज्य सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शहा यांच्या स्वाक्षरी आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -