⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

त्या तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२१ । पाळधी बुद्रुक व चांदसर ( ता. धरणगाव ) येथील दोन तलाठ्यांचे कामे असमाधानकारक असल्याने, प्रांताधिकारी विनय गोस्वामी यांनी दोघांचे निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत. बालाजी लोंढे व सुमित गवई असे तलाठ्यांचे नाव असून, या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की, तलाठी बालाजी लोंढे व सुमित गवई यांच्याबाबतीत नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आलेल्या होत्या. तसेच कामाला न्याय न देणे, मुख्यालयी न थांबणे, अतिवृष्टीच्या याद्यांमध्ये नावे वगळणे, सातबारा उताऱ्यासाठी शेतकरी व नागरिकांना धरणगावला बोलावणे अशा अनेक तक्रारी आल्या होत्या. चौकशी अंती त्यांचा अहवाल धरणगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी एरंडोलचे प्रांताधिकारी विनायक गोसावी यांच्याकडे पाठवला होता. यात तलाठी बालाजी लोंढे यांचा अहवाल असमाधानकारक होता. तसेच चांदसरचे तलाठी सुमित गवई यांनी खुलासा सादर न केल्यामुळे निलंबनाची कारवाई प्रांताधिकाऱ्यांनी केली.