त्या वादावरून चक्क पायाचे हाड मोडले ; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२१ । शहर पोलीस ठाण्यात रस्त्याच्या वापरावरुन झालेल्या वादाबाबत तक्रार देण्यासाठी जात असताना शेजारी राहत असलेल्या चार जणांकडून एकाचे लोखंडी रॉडसह बॅटने मारहाण केल्यामुळे चक्क उजव्या पायाचे हाड मोडले. ही घटना २६ रोजी शिवाजीनगर परिसरातील अमर चौकात घडली. सुरेंद्र लालचंद परदेशी (वय ४५,) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सुरेंद्र परदेशी बँकेत लिपिक म्हणून नोकरी करतात. २६ नोव्हेंबर रोजी रस्त्याच्या वापरावरुन सुरेंद्र परदेशी यांची मुलगी देवयानी हिस त्यांच्या शेजारच्या कुटुंबीयांनी शिवीगाळ करीत दमदाटी केली.

- Advertisement -

याबाबत तक्रार देण्यासाठी सुरेंद्र परदेशी शहर पोलीस ठाण्यात जात असताना शेजारी सपना राजन परदेशी यांनी सुरेंद्र परदेशी यांना शिवीगाळ केली. तर, परदेशी व त्यांचा मुलगा प्रीतेश याने लोखंडी रॉड तसेच बॅटने सुरेंद्र परदेशी यांना मारहाण केली. याचदरम्यान सुरेंद्र परदेशी यांच्या मुलीलाही संबंधितांनी धक्का देऊन खाली पाडले. मारहाणीत सुरेंद्र परदेशी यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले आहे. उपचार घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबावरुन सोमवारी रात्री जळगाव शहर पोलीस ठाण्यात राजन परदेशी, सपना परदेशी, प्रीतेश परदेशी व कोमल परदेशी या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल विजय जाधव करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

- Advertisement -

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar