शहिद जवान मंगलसिंग परदेशी यांच्या कुटुंबीयांना ६५ हजाराची मदत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । सावखेडा ( ता. पाचोरा ) येथील मंगलसिंग जयसि परदेशी यांना पठाणकोट येथे देशसेवा करीत असताना नुकतेच वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबीयास आर्या फाउंडेशनच्यावतीने ६५ हजार रुपयांची मदत देण्यात आली.

रविवार, २८ नोव्हेंबर रोजी वीरपिता जयसि परदेशी यांच्या नावाचा ६५ हजार रुपयांचा धनादेश फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी कुटुंबीयांना सुपूर्त केला.

यांची होती उपस्थिती 

अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सरोदे, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनुप येवले, संस्थेचे सचिव डॉ.राहुल महाले, सरपंच समाधान वाघ, शहीद मंगलसिंग यांची आई मीराबाई, भाऊ अनिल, ईश्वर परदेशी यांच्यासह गावकरी उपस्थित होते. डॉ.पाटील यांनी कुटुंबियांना भविष्यात देखील मदतीचे आश्वासन दिले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -