रंगकाम करताना विजेच्या तारेला स्पर्श होऊन पेंटरचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ ।  बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने तरुण पेंटरचा शाॅक लागून मृत्यू झाला. रवींद्र दशरथ तायडे (वय ३३) रा.दादा नगर असे मृताचे नाव आहे.
नाडगाव येथील रहिवासी असलेले रवींद्र तायडे हे गुरुवारी सकाळी १० वाजेच्या पूर्वी नाडगावातील शाहुनगर भागात संतोष मतोडे यांच्या घराच्या छतावरील भिंतीला रंग देत हाेते. तेथून विजेच्या तारा गेल्या हाेत्या. त्या तारांना तायडे यांचा स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, १३ व १० वर्षीय दोन मुले असा परिवार आहे.

बोदवड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर रात्री उशीरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज