⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

आदिवासी उपयोजनांच्या समिती अध्यक्षपदी बारेला

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्रातील योजनांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या यावल प्रकल्पस्तरीय समितीवर शासनाने अध्यक्षपदी डॉ. चंद्रकांत जामसिंग बारेला यांची अध्यक्षपदी तर सहा अशासकीय सदस्यांची नेमणूक केली आहे.

सविस्तर असे की, आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजना, कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्तरीय नियोजन आढावा समिती स्थापन करुन त्यांची रचना व कार्यक्षमता ठरवण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकल्पस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्याची कार्यपद्धती ठरवण्यात आलेली आहे. समितींच्या रचनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. प्रकल्प समितीवर अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

यांची नियुक्ती करण्यात आली 

यासमितीच्या अध्यक्षपदी जनसेवा हॉस्पिटल नारायणवाडी चोपडा येथील डॉ.चंद्रकांत बारेला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्यपदी मासूम रहेमान तडवी (रा.मोहरद, ता.चोपडा), जुबेदा मुजाद तडवी (रा. यावल), जमादार जफरुल्ला अमालुल्ला (रा.लोहारा, ता.रावेर), रतन बारेला (रावेर), मुजाद बोदर तडवी (यावल) व प्रताप खाज्या पावरा (रा.मैलाणे, ता.चोपडा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.