⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

शेतकऱ्यांना प्रतिगुंठा केवळ १३५ रुपये नुकसान भरपाई

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त १३५ रुपये गुंठा प्रमाणे विम्याची रक्कम जमा झाली आहे. २०२०-२१ चे केळी पीक विम्याबाबत बजाज अलायन्स कंपनीविरुद्ध ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रार केली होती त्यांना फक्त १३५ रुपये गुंठा प्रमाणे भरपाई देऊन थट्टा केली आहे. पिक विम्याचे हक्काचे पैसे, शासनाने शेतकऱ्यांना मिळवून द्यावे. अन्यथा शेतकरी संघटना पिक विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

अतिवृष्टीमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. मंत्र्यांचे दौरे, आमदारांची पिक पाहणी, तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांचे दौरे झाले. त्यानंतर पंचनामे होऊन अनुदानाची घोषणा झाली. त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पिकविमा काढला होता, त्यांनी पिकविमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या. त्याची दखल घेऊन पिकविमा कंपन्यांनी पंचनामे केले. खरीप हंगाम गेला, आता रब्बीचे बियाणे घ्यायला शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे पिक विम्याचे हक्काचे पैसे, शासनाने शेतकऱ्यांना मिळवून द्यावे. अन्यथा शेतकरी संघटना पिक विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही,

यांनी दिला इशारा 

शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील जिल्हाध्यक्ष संजय महाजन, सचिन शिंपी, अखिलेश यादव, नामदेव महाजन, विनोद धनगर, वैभव शंकपाळ, देवेंद्र पाटील, अजित पाटील, खुशाल सोनवणे, सय्यद देशमुख आदी शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.